News Room

  • cilent img
  • cilent img
  • cilent img
  • cilent img
  • cilent img
post

विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला डिजिटल

विद्यार्थांना शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ब्रिक्सलेंट व गुरुगोविंद सिंग पब्लिक स्कूल यांनी विद्यार्थांना क्यूइझिली या ॲपचे वाटप करण्यात आले. दैनंदिन अध्ययन आणि अध्यापनासाठी हे ॲप अतिशय प्रभावी ठरणारे आहे. या ॲपमध्ये एसएससी व सीबीएस्सी बोर्डाचा ५ वी व १० वी पर्यंतचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याचा वापर विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करू शकतात. याप्रसंगी ब्रिक्सलेंटचे पदाधिकारी अरविंद सोनावणे यांनी शाळेच्या सहकार्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी सीईओ परविंदर सिंग, मुख्याध्यापक मुजूमदार, वैशाली वाघ, हरीश पंजवानी, सतबीर सिंग आदी उपस्थित होते.

post

डांगसौंदाणेत क्यूझिली ॲपचे अनावरण

तताणी (ता. सटाणा), ता. १: जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय डांगसौंदाणे येथे ब्रिक्सलेंट फाउंडेशनतर्फे क्विझिली या शैक्षणिक ॲपचे अनावरण करण्यात आले. यात इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थांना युजरनेम व पासवर्ड दिले असून, विद्यार्थांना स्वतः मोबाईलच्या सहाय्याने आपल्या वर्गातील अभ्यासक्रम सोयीस्कर पद्धतीने शिकता येईल. ॲपची संपूर्ण माहिती फाउंडेशनच्या डायरेक्टर वैशाली वाघ यांनी दिली. देवळा एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेतील सर्व शिक्षकांना प्रायोगिक तत्वावर या ॲपचे डेमो दिले होते.

शिक्षकांनी हे ॲप वापरून विद्यार्थांना प्रत्यक्ष अनुभूती दिल्यानंतर ॲपची उत्कृष्टता लक्षात घेऊन सर्व शिक्षकांनी मुलांसाठीही हे ॲप उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शक करेल, या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः आपल्या इयत्तेतील सर्व विषयांचा अभ्यास घरी बसून करू शकतो, तसेच पाठावर आधारित ऑनलाइन टेस्टही देऊ शकतो. यातून विद्यार्थाला स्वअनुभूतीचा आनंद मिळणार आहे. बाजारात अशा ॲपची किंमत तीन ते चार हजारांच्या पुढे असल्याची माहिती डायरेक्टर वाघ व मॅनेजर कुणाल सुतार यांनी दिली. या वेळी मुख्याध्यापक पी. डी. पाटील, पर्यवेक्षक आर. एम निकम, सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

post

श्री. महावीर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे अध्ययन 'क्यूईझिली ईलर्निंग'मुळे सुलभ

अभ्यासक्रमासह उपक्रम, प्रकरणांचा सारांश व चाचणी परीक्षेचा समावेश

प्रतिनिधी - लासलगाव

येथील श्री. महावीर विद्यालय इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक अँड्रॉइड ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. ब्रिक्सलॅण्ड फाउंडेशन, पुणे या कंपनीतर्फे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता 'क्यूईझिली ईलर्निंग' या नावाचे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये ५ वी ते १० वीच्या प्रत्येक इयत्तेतील शालेय अभ्यासक्रमाची माहिती, उपक्रम, कृती, प्रयोग, प्रकरणांचा सारांश, चाचणी परीक्षा आदी अनेक सुविधा अँनिमेशनसह उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच प्रत्येक वर्गाच्या विषय शिक्षकांना देखील सदर सॉफ्टवेअरचे अध्ययन अध्यापनात मदत होणार आहे. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून देण्यात आले आहे.

ब्रिक्सलॅण्ड फाउंडेशन, पुणे या कंपनीचे अधिकारी वैशाली वाघ व कुणाल सुतार यांनी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना सदर सॉफ्टवेअर कसे वापरावे याचे विशेष प्रशिक्षण दिले. या कंपनीचे विद्यालयाच्या शालेय विद्यार्थी व शिक्षकांना शैक्षणिक ॲप व सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, श्री. महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, संस्थेचे संचालक मोहन बरडीया, अजय ब्रह्मेचा, महावीर चोपडा, अमित जैन, प्राचार्य दिलीप डुंगरवाल, पर्यवेक्षक मधुकर बोडके यांनी आभार मानले.

post

महावीर विद्यालयातील शैक्षणिक ॲप प्रशिक्षण

लासलगाव- येथील श्री. महावीर विद्यालय इयत्ता ५ वी ते १० वीच्या शालेय विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक अँड्रॉइड ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. ब्रिक्सलॅण्ड फाउंडेशन पुणे या कंपनीतर्फे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता 'क्यूईझिली इ लर्निंग' या नावाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये ५ वी ते १० वीच्या प्रत्येक वर्गासाठी शालेय अभ्यासक्रमाची माहिती, उपक्रम, कृती, प्रयोग, प्रकरणांचा सारांश, चाचणी परीक्षा आदी सुविधा अँनिमेशनसह उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच प्रत्येक वर्गाच्या विषय शिक्षकांनादेखील सॉफ्टवेअरची अध्ययन अध्यापनात मदत होणार आहे. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून देण्यात आले आहे.

ब्रिक्सलॅण्ड फाउंडेशन, पुणे या कंपनीचे अधिकारी श्रीमती वैशाली वाघ व कुणाल सुतार यांनी विद्यार्थांना प्रशिक्षण दिले. संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, श्री. महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, संस्थेचे संचालक मोहन बरडीया, अजय ब्रह्मेचा, महावीर चोपडा, अमित जैन, प्राचार्य दिलीप डुंगरवाल, पर्यवेक्षक मधुकर बोडके यांनी संबंधितांचे आभार मानले.

post

कळसुलकरच्या विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल ॲप

लुपिन फाऊंडेशनतर्फे आयोजन : क्यू - इझिली कंपनीतर्फे केली शाळेची निवड

लुपिन ह्युमन वेलफेअर आणि रिसर्च फाउंडेशन यांच्यामार्फत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. क्यूइझिली कंपनी, पुणे यांच्यामार्फत ब्रिक्सलेंट आय. एन. सी ह्या माध्यमातून शालेय विद्यार्थांना डिजिटल लर्निंगची सुविधा वेबसाईट व अँड्रॉइड ॲपद्वारे मोफत निवडक शाळांना दिली जाते. त्यासाठी येथील कळसुळकर इंग्लिश स्कूलची निवड झाली आहे. कंपनीचे रिलेशनशीप मॅनेजर हरीश पंजवानी यांनी इंस्टॉलेशन प्रोसेसची माहिती विद्यार्थांना करून दिली. या ॲपचा बाजारभाव प्रतिविद्यार्थी पाच ते आठ हजार रुपये आहे. तो लुपिन फाउंडेशनने प्रशालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांबद्दल मोफत उपलब्ध करून देत ग्रामीण भागातील विद्यार्थांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात अग्रेसर करण्याच्या दृष्टीने मोलाचा वाट उचलला. लुपिन फाउंडेशनच्या २००० पासून महाराष्ट्रात कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी असते. संस्थेची सुरुवात १९८८ मध्ये भरतपूर - राजस्थान येथे सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून झाली. पुढे त्यांच्या पत्नी उषा प्रभू यांनी संस्थेचे कामकाज यशस्वीपणे पुढे नेले.

पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थांना ब्रिक्सलेंट या कंपनीच्या माध्यमातून क्यूइझिली डॉट कॉम हा शैक्षणिक अभ्यासक्रम व विविध सहशालेय उपक्रमांचे डिजिटल सॉफ्टवेअर आहे. मोबाईलवरील गेम, सोशल मीडियावर व्यस्त असणाऱ्या मुलांनी अभ्यासक्रमाच्या दिशेने परिवर्तित करणारे, वेळोवेळी चाचण्या घेऊन विद्यार्थांचा दर्जा ठरविणारे, प्रशालेकडून सामूहिक सूचना व प्रगतीचा आढावा पालकांपर्यंत पोहचविणारे, प्रशालेतील विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन वापरता येणारे बहुपयोगी सॉफ्टवेअर विद्यार्थांना मोफत मिळत आहे. सदर सॉफ्टवेअर सहजरित्या स्वयंअध्ययनासाठी वापरता येईल. प्रशालेकडून कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थाचा, वर्गशिक्षकाचा, मुख्याध्यापकांचा ई-मेल आयडी तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून हे डाउनलोड झालेले ॲप ऑफलाईनसुद्धा वापरता येणार आहे. प्रशालेला व विद्यार्थांना ॲपच्या अधिकाधिक उत्पादनावर उपयोगावर आकर्षक बक्षिसे लुपिन फाऊंडेशनमार्फत देण्यात येणार आहेत. यावेळी क्यूइझिली डॉट कॉमचे रिलेशनशिप मॅनेजर हरीश पंजवानी, लुपिन फाऊंडेशन सावंतवाडी, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे रमेश बोन्द्रे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, कळसुळकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.